महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपने २५ वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन आजही अपूर्ण : काँग्रेस - काँग्रेस

पणजी येथील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पक्ष प्रवक्ता अॅड. यतीश नायक यांनी भाजवर टीका केली.

अॅड. यतीश नायक

By

Published : May 15, 2019, 9:58 PM IST

पणजी -भाजपने १९९४ च्या निवडणुकीत पणजीतील सांतीनेज खाडी पुनर्जिवीत आणि स्वच्छ करण्याचे दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण केलेले नाही. त्यांनी पणजीची प्रगती करण्याऐवजी अधोगतीच केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रवक्ता अॅड. यतीश नायक

पणजी येथील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पक्ष प्रवक्ता अॅड. यतीश नायक म्हणाले, पणजीतील नागरिक रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या शोधात आहेत. तर भाजप स्मार्ट सिटीच्या गोष्टी करत आहे. १९९४ मध्ये मनोहर पर्रीकर यांनी पणजीतील प्रभाग क्रमांक तीनमधील सांतिनेज खाडीचे पुनर्जिवन आणि स्वच्छता हा प्रचारातील प्रमुख मुद्दा बनविला होता. त्यानंतर पर्रीकर हे २५ वर्षे पणजीचे प्रतिनिधित्व करताना विविध महत्त्वाच्या पदांवर राहिले. पण दिलेली आश्वासने पूर्ण करू शकले नाहीत. सांतीनेज खाडीची आजची स्थिती भाजपचे अपयश दर्शवते.

यावेळी नायक यांनी १६ नोव्हेंबर १९९४ मध्ये एका स्थानिक वृत्तपत्रात तत्कालीन भाजप उमेदवार मनोहर पर्रीकर यांच्या प्रचाराची जाहीरात दाखवली आणि या जाहिरातीमध्ये दाखविण्यात आलेली सांतीनेज खाडीची स्थिती आणि आजची स्थिती सारखीच असल्याचे सांगितले. त्यामुळे ही खाडी पुनर्जिवित करण्यात अपयश का आले?, शहरात चांगले रस्ते का नाहीत?, पुरेसे पाणी पुरविण्यात का अपयश आले?, पार्किंग अडचणी का दूर झाली नाही? आणि शहरासाठी चांगला कचरा प्रकल्प का आणण्यात आला नाही? असे पाच प्रश्न या निमित्ताने नायक यांनी भाजपला विचारले आहेत.

यावेळी मांद्रे पोटनिवडणुकीतील उमेदवार बाबी बागकर, विजय पै आदी पदाधिकारी उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details