महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेस पराभवाची जबाबदारी स्वीकारतो - गिरीश चोडणकर - गोवा प्रदेश काँग्रेस

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली.

पणजी

By

Published : May 23, 2019, 10:54 PM IST

पणजी - अध्यक्ष म्हणून प्रचारात कमी पडलो. सर्व मतदारसंघात पोहचण्यात अपयशी ठरलो. लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असून काँग्रेसच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज जाहीर केले. यावेळी विरोधी पक्षनेते बाहेर बाबू कवळेकर उपस्थित होते.

पणजी

काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना चोडणकर म्हणाले, गोव्यातील जनतेने आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान करून विश्वास दाखवला. त्याबद्दल लोकांचे, गोमंतकीयांचे आभार मानतो. मात्र, आम्ही लोकांसोबत असून लोकविरोधी निर्णयाला विरोध करू. आम्ही अजून पराभवाच्या कारणांवर विचार केलेला नाही. जे आवश्यक ते दिल्लीत हायकमांडलाही सांगणार आहोत.

उत्तर गोवा मतदारसंघात भाजपचे श्रीपाद नाईक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाबद्दल शुभेच्छा देत चोडणकर म्हणाले की, पणजीवासीयांना धन्यवाद देण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. तसेच गोव्याचे नवनिर्वाचित खासदार दिल्लीत गोव्याचा आवाज बनून काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

निवडणूक प्रचारासाठी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. सर्वांनी एक दिलाने काम करून सुद्धा तीन विधानसभा आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला, याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे चोडणकर म्हणाले. दरम्यान, चोडणकर हे काँग्रेसचे उत्तर गोवा मतदासंघाचे उमेदवार होते.

ABOUT THE AUTHOR

...view details