महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नोटबंदी, जीएसटीने नागरिक हैराण - राहुल गांधींची टीका - etv bharat maharshtra

नोटबंदी आणि जीएसटी लागू करून भाजप सरकारने शिस्तबद्ध पद्धतीने शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना संपवायचे काम केले अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली. ते आज (शनिवार) पासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.

Rahul gandhi
नोटबंदी, जीएसटी ने नागरिक हैराण

By

Published : Oct 30, 2021, 9:28 PM IST

पणजी - देशात मोदी शहा आपला मनमानी कारभार करत आहेत. नोटबंदी आणि जीएसटी लागू करून सामान्य लोकांचे कंबरडे मोडत आहे. त्यांच्या या घातकी निर्णयामुळे शेतकरी, सामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. सामान्य नागरिकांना अच्छे दिनचे गाजर दाखवून प्रत्यक्षात मात्र गोव्यात अनेक खाजगी प्रकल्प आणून अदानी आणि अंबानी चे भले करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली आहे.

नोटबंदी, जीएसटी ने नागरिक हैराण
विनाशकारी प्रकल्प कोणासाठीदेशात आणि राज्यात सगळेच प्रकल्प अदानी आणि अंबानीला देऊन सरकार कोणाचे भले करत करत आहे असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राज्याला कोळसा हब बनवून गोवा ही अदानीला गहाण दिल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. मायनिग अदानीला, विमानतळ अदानीला आणि आता राज्यातील कोळसा हब अदानीला देण्याच्या निर्णयाला आपला विरोध असून आपण गोवेकारांसोबत उभे असल्याचे राहुल यांनी सांगितले.
राहुल गांधींचा गोव्याचा दौरा
गोव्यातील स्थानिक प्रश्नांना सोडवणारराज्यात मायनींग, कोळसा, मच्छिमार, बेरोजगारी, पर्यटन क्षेत्रात अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या सर्वच प्रश्नांना राहुल गांधी यांनी हात घातला आहे. रविवारी सकाळी त्यांनी मायनिग पीडितांसोबत व मच्छिमार बांधवांसोबत बैठक केली. आपले सरकार आल्यावर मायनिग सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. बेरोजगारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात एज्युकेशन हब उभारणार असल्याचेही ते म्हणाले.
राहुल गांधींची सरकारवर टीका
तृणमूल आणि भाजपावर टीकाराज्यात बाहेरून आलेल्या तृणमूल पक्षावर ही राहुल गांधी यांनी टीका केली. राज्यात फक्त काँग्रेसची हवा आहे, २०१७मध्ये काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते, त्यांना 2019 ला भाजपने आपल्या पक्षात घेऊन सरकार स्थापन केले. अशा डिफेक्टर आमदारांना जनताच धडा शिकवनार असल्याचेही राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details