पणजी - 'ईस्टर संडे'च्या दिवशी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र निषेध केला आहे. त्याबरोबरच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांना गोव्यातील चर्चच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर गोव्यात चर्चच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ - safety
'ईस्टर संडे'च्या दिवशी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र निषेध केला आहे.
श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये रविवारी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले, इस्टर संडेच्या दिवशी करण्यात आलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. या पार्श्वभूमीवर गोव्यातील चर्चची सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गोव्याचे आर्च बिशप यांच्याशीही चर्चा करणार आहे. आवश्यकता भासली तर सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.