पणजी - केंद्रीय नौकावहन मंत्री मनसूख मांडलीय यांनी काल गुरुवारी दक्षिण गोव्यातील मुरगांव पोर्ट ट्रस्टला भेट दिली. यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली आहे.
केंद्रीय नौकावहन मंत्र्यांची मुरगांव पोर्ट ट्रस्टला भेट - मुरगांव पोर्ट ट्रस्ट
मांडलीय यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जानून घेतल्या. तसेच त्यावरील उपायांची देखील चर्चा केल्याची माहिती आहे.
मुरगांव पोर्ट ट्रस्ट परिसरात व्रुक्षारोपण
गोव्याच्या दौऱ्यावर असलेल केंद्रीय नौकावहन मंत्री मनसूख मांडलीय यांनी गुरुवारी मुरगांव पोर्ट ट्रस्टला भेट दिली. यावेळी त्यांनी न्यासाशी संबंधित भागधारक, विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यावरील उपायांची देखील चर्चा केली. या भेटी दरम्यान मांडलील यांनी मुरगांव पोर्ट ट्रस्ट परिसरात व्रुक्षारोपण केले.
हेही वाचा -प्लास्टिक प्रदूषणामुळे महासागर तुंबतायत; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता..