पणजी- विश्वजीत राणे यांनी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विश्वजित राणे हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. राणे आणि प्रमोद सावंत यांच्यात बरेच दिवसांपासून शीतयुद्ध सुरु आहे. त्यामुळे भाजपाची अंतर्गत राजकिय बंडाळी चव्हाट्यावर येणार काय याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रीय निरिक्षक गोव्यात येण्याच्या पार्श्वभूमिवर अंतर्गत बंडाळी समोर आल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
Goa Politics : गोव्यात भाजपची अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर; भाजपाच्या विश्वजित राणेंनी घेतली राज्यपालांची भेट
विश्वजीत राणे यांनी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विश्वजित राणे हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्यात बरेच दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे भाजपाची अंतर्गत राजकिय बंडाळी चव्हाट्यावर येणार काय याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रीय निरिक्षण गोव्यात येणार आहेत. त्यांच्या येण्यापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
'मगो'च्या पाठिंब्यालाही भाजपांतर्गत विरोध
निकाल जाहीर झाल्यानंतर गोवा भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपाला गोव्यात तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपाच्या एकूण जागांनी (२३) बहुमताचा टप्पा पार केला आहे. मात्र, भाजपा सरकार स्थापनेच्या दाव्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती येत आहेत. गोव्यात भाजपाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा (एमजीपी) पाठिंबा घेतल्याबद्दल पक्षाकडे आपला निषेध नोंदवला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत एमजीपीचे दोन आमदार विजयी झाले आहेत. सुदिन ढवळीकर आणि जीत आरोलकर, हे एमजीपीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. गोवा निवडणुकीत एमजीपीची तृणमूल काँग्रेससोबत युती होती. गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एमजीपीने भाजपाला पाठिंबा देण्याचे पत्र सादर केले आहे.
गोव्यात भाजपाला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 11, आम आदमी पक्षाला 2, गोवा फॉरवर्ड पार्टीला 1, महाराष्ट्रवादी गोमंतक 2, RG पक्षाला 1 आणि अपक्ष उमेदवारांना 3 जागा मिळाल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा असून बहुमताचा आकडा 21 आहे. भाजपाला अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा मिळाल्यास राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.