पणजी- गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी व्यक्त केला आहे. 22 अधिक 22 जागा नक्की निवडून येतील, असाही विश्वास डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. संध्याकाळी हॉटेल फिदालगो येथे भाजपच्या सर्व उमेदवारांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता स्थापन होणार असून वाढलेल्या मतदानाचा ( Goa Election ) फायदा भाजपला होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2012 आणि 2017 मध्येही साखळी मतदारसंघात 90 ते 92 टक्के मतदान झाले होते. त्यावेळीही आपण मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.