पणजी- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भर कार्यक्रमात डॉक्टरांनी वैद्यकीय कचऱ्याच्या विषयावरून गोंधळ घातला. भाजपाच्या डॉक्टर सेलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला जेपी नड्डा संबोधित करत असताना हा प्रकार घडला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Chief Minister Dr. Pramod Sawant ) यांना राष्ट्रीय अध्यक्षांसामोर वाकुल्या दाखविण्यासाठी त्यांच्याच एका सहकाऱ्याने हेतुपूर्वक हा प्रकार घडवून आणल्याचे बोलले जाते.
पणजी- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते साखळी आणि बिचोलीम मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. साखळी आणि बिचोलीम हा डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे वर्चस्व असेलेले मतदारसंघ आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या कार्यक्रमात डॉक्टरांचे निदर्शने मुख्यमंत्र्यांना वाकुल्या दाखविण्यासाठी राजकीय डावपेच
भाजपच्या डॉक्टर सेलची एक विशेष सभा पणजीतील तारांकित हॉटेलमध्ये आयोजित केली होती. त्याला राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा संबोधित करत होते. त्यामुळे देशाचे केंद्रीय मंत्री सी.टी. रवी, श्रीपाद नाईक यांच्यासह खासदार मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. वास्तविक हा मुद्दा आरोग्यखाते आणि कचरा व्यवस्थापन खात्याशी संबधित होता. आणि या खात्यांचे मंत्री आहेत डॉ विश्वजित राणे आणि मायकल लोबो. मात्र मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासमोर वाकुल्या दाखविण्यासाठी हेतुपूर्वक हा कार्यक्रम आखला गेल्याचे बोलले जाते.
शुल्लक कारणावरून गोंधळ- मुख्यमंत्री
राज्यात वैद्यकीय कचरा उचलण्यासाठी 1800 रुपये दर आकारला जातो. मात्र डॉक्टरांची मागणी आहे की, हा दर इतर राज्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. सरकार यावर 50 टक्के अनुदान द्यायला तयार आहे. त्यासाठी कंत्राटदाराशी बोलून यावर पर्याय काढला जाऊ शकत होता. डॉक्टरांना राजकीय हेतुपूर्वक मॅनेज करण्यात आले होते. काही राजकीय नेत्यांच्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रकार केला असून राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या कार्यक्रमात येवून गोंधळ घातल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.