पणजी - गोव्याचा ५५ वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास गेल्या पाच वर्षांत भाजपने केला आहे. याची गोमंतकियांना जाणीव आहे. त्यामुळे गोवावासीय लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपला जिंकून देतील, असा विश्वास केंद्रीय आयुषमंत्री तथा भाजपचे उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. त्यांनी संध्याकाळी खोर्ली-म्हापसा येथील बुथला भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
मागील ५५ वर्षापेक्षा अधिक विकास भाजपने गेल्या पाच वर्षांत केला - श्रीपाद नाईक - candidate
लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करत आहेत. याचा फायदा मोठ्या प्रमाणात भाजपला होईल. गेल्यावेळेपेक्षा यंदा अधिक मताधिक्य मिळेल.
नाईक मागील २० वर्षे उत्तर गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. नाईक म्हणाले, लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करत आहेत. याचा फायदा मोठ्या प्रमाणात भाजपला होईल. गेल्यावेळेपेक्षा यंदा अधिक मताधिक्य मिळेल. आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. भाजपला अभूतपूर्व यश मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने प्रचारात काही फरक जाणवतो का? असे विचारले नाईक म्हणाले, 35 वर्षांंहून अधिक काळ एकत्रित काम केले. ते पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांनी काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.