पणजी ( गोवा ) :राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का ( Congress shock in Goa ) बसला असून, 11 पैकी आठ आठ आमदार आज भाजपा प्रवेश ( Eight Congress MLAs Joine BJP ) करणार आहेत.त्यानिमित्ताने गोवा विधानसभा परिसर क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेसचे आठ आमदार भाजपात जाणार असून त्यानिमित्ताने गोवा विधानसभा परिसर क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही आमदार विधानसभा परिसर क्षेत्रात येण्यास सुरुवात झाली आहे. काही आमदार आतमध्ये दाखल झालेले आहेत.'
काँग्रेचे अंर्तगत कलह चव्हाट्यावर -गोव्यात नेत्यांच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करण्यात आलेले अपयश यामुळे अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांची काँग्रेसने पदावरून काही दिवसापूर्वी हकालपट्टी केली होती. त्यामुळे काँग्रेसने कोणत्याही अन्य नेत्याची निवड केलेली नव्हती. सध्या राहूल गांधी भारत जोडो पदयात्रेवर असल्याने गोव्यातील राजकीय भूकंप कसा थोपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या अंतर्गत कलाहामुळे गोवा काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काही महिन्यापूर्वी गोव्यात राजकीय हलचालीना वेग आला होता. तेव्हापासूनच काँग्रेचे अंर्तगत कलह चव्हाट्यावर आले होते.
मायकल लोबो विरोधात कडक कारवाई -काही दिवसापुर्वी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांची पक्षातून हाकालपट्टी केली होती. यांच्या विरोधात गोवा प्रदेश काँग्रेसने अपात्रता याचिका दाखल केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने काँग्रेसने त्यांच्याविरोधात कडक कारवाई केल्याचे काँग्रेसर्फे सांगण्यात आले होते.
'हे' आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
मायकल लोबो
दिगंबर कामत
दिलायला लोबो