पणजी- मागील 25 वर्षे पणजीकडे सत्ताधाऱ्यांनी दूर्लक्ष केले आहे. त्यामुळे गोव्यातील सरकारही निश्चितच बदलणार, असा विश्वास काँग्रेसचे पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आज व्यक्त केला. तसेच पणजीतील लोक प्रतिनिधित्व करण्याची संधी मला देतील, असेही ते यावेळी म्हणाले.
गोव्यात सरकार निश्चितच बदलणार - बाबूश मोन्सेरात - पणजी
मागील 25 वर्षे पणजीकडे सत्ताधाऱ्यांनी दूर्लक्ष केले आहे. त्यामुळे गोव्यातील सरकारही निश्चितच बदलणार, असा विश्वास काँग्रेसचे पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आज व्यक्त केला.
मोन्सेरात म्हणाले, की राज्य सरकारमधील घटकपक्ष कोठे आहेत? सरकारमधील हे घटकपक्षातील सर्वजण मागच्या वेळी प्रचारात होते. आज ते कोठे आहेत? तसेच त्यांचेच लोक त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे हे सरकार बदलणार हे निश्चित आहे, असे ते म्हणाले.
त्याबरोबरच पणजीतील लोक मला माझी क्षमता सिद्ध करण्याची संधी देणार याची खात्री आहे. कारण जेव्हा मी प्रचारात फिरत होतो तेव्हा मागच्या वेळीपेक्षा यावेळी अधिक प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे विरोधक विकासाविषयी न बोलता माझ्या चारित्र्यावर बोलत आहे. मात्र, मी गोव्याला नवा नाही, असेही ते यावेळी म्हणाले.