पणजी - काँग्रेसने पणजीवासीयांकडून जाहीरनाम्यासाठी सूचना मागवल्या होत्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५ हजारांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यामधूनच छाननी करून जाहीरनामा तयार केला आहे. त्यामुळे विधानसभेत प्रतिनिधित्त्व करण्याची संधी दिल्यास पुढील २ वर्षांत यामधील ८० टक्के वचने पूर्ण करेल, अशी ग्वाही पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आज दिली.
मळा-पणजी येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोन्सेरात बोलत होते. गेल्या २५ वर्षांपासून पणजी विधानसभा भाजपकडे होती. त्यांच्या आमदाराने विकास केला असता तर लोक माझ्या सभेला मोठ्या संख्येने जमले नसते. त्यामुळे पणजीचा प्रतिनिधी झाल्यास प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.