महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देशाला अनेक कायदे असतील, पण कला आणि संगीत यांना सीमा नसतात - पटकथाकार के. एम. वेणुगोपाळ - कोळंबी

इफ्फी मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कोळंबीचे दिग्दर्शक टी. के. राजीवकुमार, अभिनेत्री नित्या मेनन, रोहिणी, 'आनंद गोपाळ' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विध्वंस आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपापल्या चित्रपटांच्या कथा उलगडून सांगितल्या.

इफ्फी
के. एम. वेणुगोपाल

By

Published : Nov 27, 2019, 7:51 PM IST

पणजी- राष्ट्राला अनेक कायदे आणि मर्यादा असतात. परंतु, कला आणि संगीत यासाठी अशा सीमांची मर्यादा नसते. सीमा आणि मर्यादा यांच्यापलीकडे संगीत पोहोचत असते, असे मत 'कोळंबी' या मल्याळम चित्रपटाचे पटकथाकार के. एम. वेणुगोपाळ यांनी व्यक्त केले. इफ्फी मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कोळंबीचे दिग्दर्शक टी. के. राजीवकुमार, अभिनेत्री नित्या मेनन, रोहिणी, 'आनंद गोपाळ' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विध्वंस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करताना के. एम. वेणुगोपाळ


चित्रपटाच्या पार्श्वभूमी विषयी बोलताना राजीवकुमार म्हणाले, 2005मध्ये ध्वनी प्रदूषण कायदा अस्तित्वात आल्यानंतरची परिस्थिती चित्रित करण्यात आली आहे. ज्यामध्ये 1960च्या दशकात लाऊड स्पीकरवर गाण्यासाठी लोक खूप आकर्षित होत असत. अशाच एका माणसाची ही कथा आहे. जो केरळमधील संगीताचा प्रवास आपल्या लाऊड स्पीकरच्या माध्यमातून जतन करू इच्छित आहे.


कोळंबीमधील मुख्य अभिनेत्री नित्या मेनन म्हणाली, मला जेव्हा दिग्दर्शकाने ही कथा ऐकवली तेव्हा ती प्रभावी वाटली म्हणून ताबडतोब स्वीकारली. तर आनंदी गोपाळचे दिग्दर्शक संजय विध्वंस म्हणाले, ही गोष्ट 140 वर्षांपूर्वीच्या एका जोडप्याची आहे. ज्यामध्ये एक महिला काही माहिती नसताना डॉक्टर बनण्याचा विचार करते. यासाठी आम्ही आनंदी जोशी यांचे चरित्र तसेच तत्कालीन साहित्य वाचले. ज्यामुळे तेव्हाची परिस्थिती आणि रंगसंगती समजण्यासाठी मदत झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details