महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद - goa

राष्ट्रीय स्तरावरील जाहिरातपटात सुनील नाईक आणि मिरांशा नाईक यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केले. तर गोवा विभागात अमोल प्रभूगावकर, मयूर कांबळी आणि ब्रिजेश काकोडकर यांनी अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त केले.

गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सव

By

Published : Jun 1, 2019, 3:17 AM IST

पणजी - तंबाखू विरोधात जागृती करण्यासाठी गोवा मनोरंजन संस्था आणि गोवा दंत महाविद्यालय यांच्या संयक्त विद्यमाने 'गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला गोवेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.


यावेळी बोलताना डॉ. शेखर साळकर म्हणाले, व्यसन न करणे हाच व्यसनापासून दूर राहण्याच प्रभावी उपाय आहे. कारण व्यसनाधीन झालेल्यांना त्यापासून दूर करणे कठीण असते. ३० टक्केच लोक व्यसनमुक्त होऊ शकतात. ७० टक्के व्यसनात मरेपर्यंत कायम राहतात.

या कार्यक्रमाला अर्थसचिव दौलत हवालदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक, गोवा दंत महाविद्यालयाच्या डीन डॉ. आयरा दी नोरोन्हा अथाइड, अमिता केंकरे कामत आदी उपस्थित होते. हवालदार यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. चित्रपटांचे परिक्षण मणिपाल इस्पितळाच्या अँकॉलॉजी विभागाचे डॉ. शेखर साळकर, डॉ. वर्षा कामत, डॉ. नंदिनी कामत, संग्राम गायकवाड आणि सचिन चाटे यांनी केले.


राष्ट्रीय स्तरावरील जाहिरातपटात सुनील नाईक आणि मिरांशा नाईक यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केले. तर गोवा विभागात अमोल प्रभूगावकर, मयूर कांबळी आणि ब्रिजेश काकोडकर यांनी अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details