पणजी - पर्यावरणावरील वाढत्या आघातामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी जगभरातील पर्यावरणप्रेमी ठिकठिकाणी निदर्शने करत आहेत. गोव्यातही शुक्रवारी संध्याकाळी 'गोवा ग्रीन ब्रिगेड' आणि 'इको चँम्पिमन ऑफ गोवा'च्यावतीने जागृतीसाठी निदर्शने करण्यात आली. ज्यामध्ये स्थानिकांबरोबर विदेशी पर्यटक सहभागी झाले होते.
राष्ट्रीय महामार्गानजीक निदर्शन या निदर्शनाविषयी बोलताना पर्यावरणप्रेमी जॉन मेंडोसा म्हणाले, जगभारात पर्यावरण बदलाचे परिणाम दिसून येत आहेत. वातावरण बदलाची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आग लागण्याबरोबर पुराचा प्रभाव दिसत आहे. हे रोखण्यासाठी जगभारातील पर्यावरणप्रेमी संघर्ष करत आहेत. या समस्येविरोधात जगभारातील सरकारांनी एकत्रीत लढा देणे आवश्यक आहे. पृथ्वी आणि पुढील पिढ्यांचे भवितव्य वाचविण्यासाठी आताच पावले उचलली गेली पाहिजे. आता नाही तर कधीच नाही. तर स्वँन ही विद्यार्थ्यीनी म्हणाली, आमच्या भविष्यासाठी आमचा लढा आहे. आज गोव्यातून ही छोटीसी सुरुवात आहे. आम्हाला आणि पुढच्या पिढीला त्रास होऊ नये, यासाठी पर्यावरण रक्षण करणे आवश्यक आहे. झाडांची कत्तल थांबवली जावी, यासाठी जागृती होणे आवश्यक आहे. तर जोहाना म्हणाल्या, आमच्या पुढच्या पिढीला भवितव्य देण्यासाठी आताच आम्हाला सवयी बदलाव्या लागतील. आरोग्यदायी जीवनासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील.
हेही वाचा -सरकार अन् उद्योगपतींमध्ये अविश्वास वाढत आहे - उद्योगपती अजय पिरामल
या निदर्शनात विदेशी युवती आणि लहान मुले यांचा सहभाग होता. रस्त्याच्या बाजूला उभे राहून फलकांद्वारे संदेश दिला जात होता. तसेच लहान मुले गाणीही म्हणून लोकांना पर्यावरण सरक्षणाचा संदेश देत होती. आंदोलनाविषयी बोलताना गोवा ग्रीन ब्रिगेडचे संयोजक आवेर्तिनो मिरांडा म्हणाले, यापुढे दर शुक्रवारी संध्याकाळी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात पर्यावरण जागृती केली जाणार आहे. यापूर्वी या समस्येविषयी राज्यसरकारला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत.
हेही वाचा -जोधपूरमध्ये बस अन् बोलेरोचा भीषण अपघात; १६ ठार, १० गंभीर