महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सरकारी गोंधळामुळे जिल्हा पंचायत निवडणूक लांबणीवर, 'आप'चा आरोप - News about Elvis Gomes of A A P

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांच्या सोयीचे आरक्षण निश्चित होत नसल्याने सरकार गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे भाजपच्या दबावामुळोे निवडणूक आयोग जिल्हा पंचाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास उशीर करत असल्याचा आरोप आपने केला आहे.

aam-aadmi-party-alleges-that-bjp-did-not-release-the-district-panchayat-election-dates
सरकारी गोंधळामुळे जिल्हा पंचायत निवडणूक लांबणीवर : 'आप'चा आरोप

By

Published : Feb 11, 2020, 9:18 AM IST

पणजी -काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांच्या सोयीचे आरक्षण निश्चित होत नसल्याने सरकार गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे भाजपच्या दबावामुळे राज्य निवडणूक आयोग जिल्हा पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास उशीर करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

सरकारी गोंधळामुळे जिल्हा पंचायत निवडणूक लांबणीवर : 'आप'चा आरोप

मिरामार-पणजी येथे पक्ष कार्यालयात बोलताना गोवा संयोजक एल्वीस गोम्स म्हणाले, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आयोजन गोव्यात 15 मार्चला जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याची अधिसूचना जाहीर केली होती. मात्र, आता आयोगावर दबाव असल्याचे दिसत आहे. ज्यामुळे अजूनही निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यावर सत्ताधारी भाजचा दबाव असल्याचे जाणवते. काँग्रेसमधून फूटून भाजपात गेलेले आमदार निवडणूक आरक्षणाबाबत गोंधळले आहेत. त्यांना कोणते आरक्षण कुठे लागू करावे, हे समजत नाही. राज्य निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचत आहे. कारण राज्याचे मुख निवडणूक आयुक्त हे माजी सनदी अधिकारी आहेत. निव्रूत्तीनंतरचा काळ गोव्यात आरामात घालविण्यासाठी त्यांची येथे नियुक्ती केली असावी.

जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय चिन्हावर होऊ नये, असे आमचे मत होते. मात्र, आता निवडणूक तशाप्रकारे घेतली जाणार आहे. त्यामुळे आपही आपले उमेदवार यावेळी रिंगणात उतरवणारा आहे, असेही गोम्स म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेमुळे याला उशीर होत आहे का?, असे विचारले असता गोम्स म्हणाले, कदाचित असेलही. कारण केजरी'वॉल' विरूद्ध बाकी सर्व पक्ष असेच राजकीय समीकरण बनले आहे. यावेळी सरचिटणीस प्रदीप पाडगावळ, वाल्मिकी नाईक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details