पणजी- पोलीस उपनिरीक्षक राहुल नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कांपाल येथे संशयित हनुमंत शिवाप्पा करबिमन्ना (32 वर्षे) या व्यक्तीला 180 ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले आहे. या मुद्देमालाची किंमत सुमारे 36 हजार रुपये आहे. संबंधित व्यक्तीला अटक केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार वैद्यकीय तपासणी करून कोठडीत रवानगी करण्यात आली. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष गावकर करत आहेत.
गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; गोवा पोलिसांची कारवाई - पणजी पोलीस स्थानक
गांजा बाळगल्याप्रकरणी गुरुवारी (दि.५ ऑगस्ट)ला रात्री गोव्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
गांजा बाळगल्याप्रकरणी गुरुवारी रात्री गोव्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांना ताब्यात घेण्यात आले
हेही वाचा पणजीतील साखळी शहरात पाच लाखांचा गांजा जप्त; एकास अटक
तसेच नागाळी-ताळगाव येथे रात्री 12 च्या सुमारास संदेश कुटकर (24 वर्षे) याला 110 ग्रॅम वजनाच्या सुमारे 22 हजार रुपये किंमतीच्या गांजासह अटक करण्यात आली. ही कारवाई पणजी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आदित्य वेळीप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.