नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका कार्येक्षेत्रातील कलाकारांना त्यांची कला सादर करता यावी, यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने नवी मुंबई महापौर चषक अंतर्गत नवी मुंबई कार्यक्षेत्राबरोबरच नवी मुंबई लगतच्या शहरातील नृत्य व गायन क्षेत्रातील कलाकारांचा समावेश करून नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धा २०१८-१९ चे आयोजन करण्यात येत आहे.
महापौर चषक अंतर्गत नृत्य व गायन स्पर्धेचे आयोजन - chashak
नवी मुंबई कार्यक्षेत्राबरोबरच नवी मुंबई लगतच्या शहरातील नृत्य व गायन क्षेत्रातील कलाकारांचा समावेश करून नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धा २०१८-१९ चे आयोजन करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धेत नवी मुंबईसह, ठाणे, मुंबई या जिल्हातील कलाकार सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा १५ वर्षातील व १५ वर्षावरील या २ गटात वैयक्तिक व समुह अशा स्वरुपात होणार आहेत. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ८ फेब्रुवारीला होणार असून महाअंतिम फेरी १२ फेब्रुवारीला विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटात ४ पारितोषिके असणार आहेत. त्याचबरोबर प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची रोख बक्षिसे विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत नामांकित कलाकारांनी सहभाग घेतलेला असून त्यांची कला पाहण्याची नामी संधी नागरीकांना विनामुल्य मिळणार असल्याने जास्तीत जास्त कलाप्रेमीनीं या महाअंतिम सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर जयवंत सुतार यांनी केलेले आहे.