नाशिक- गोदावरी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुतोंड्या मारुती आणि रामसेतु पुल पाण्यात बुडाला आहे. तरीही अतिउत्साही युवक पुराच्या पाण्यात उड्या मारून जीव घेणे स्टंट करत असून, पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.
नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात युवकांची स्टंटबाजी - stunts in water
नाशिकमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणे भरली असून धरणांतील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोदावरी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून, दुतोंड्या मारुती आणि रामसेतु पुल बुडाला आहे. तरीसुध्दा काही अतिउत्साही युवक गाडगे महाराज पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या मारून स्टंट करत आहेत. प्रशासनाने नागरिकांना पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी करू नये व पुराच्या पाण्यात उतरू नये अशा सूचना दिल्या.
पुराच्या पाण्यात युवकांची स्टंटबाजी
या धरणांतून होतोय पाण्याचा विसर्ग :
- गौतमी गोदावरी- 6225 क्युसेस,
- आनंदी धरण- 687 क्युसेस
- दारणा धरण- 23192 क्युसेस
- भावली धरण- 1509 क्युसेस
- वालदेवी धरण- 502 क्युसेस
- नांदुर मध्यमेश्वर धरण- 83773 क्युसेस
- पालखेड धरण- 5007 क्युसेस
- चणकापूर धरण- 7307 क्युसेस
- पुनद धरण- 2895 क्युसेस