महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Crime News : मित्राला मिठी का मारली म्हणून तरुणावर चॉपरने हल्ला

नाशिक येथे वाढदिवसाची पार्टी सुरू असताना मिठी का मारली हा प्रश्न विचारताच दीपक वाघमारे यांच्यावर चॉपरने हल्ला (Man attacked by Chopper) केला. या हल्ल्यात दीपक वाघमारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nashik Crime News
Nashik Crime News

By

Published : Dec 14, 2021, 4:38 PM IST

नाशिक :- नाशिकमध्ये सध्या अगदी कुठल्याही शुल्लक कारणावरून तरुणांमध्ये थेट जीवघेणे हल्ले होत आहेत. सिडको परिसरातील तरुणावर वार केल्याची घटना ताजी असतानाच, मित्राला मिठी का मारली असे विचारत तरुणावर (Man attacked by Chopper) प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दीपक वाघमारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीसांची प्रतिक्रीया

संशयित भूषण काळे पोलिसांच्या ताब्यात
रविवारी रात्री आडगाव परिसरात बर्थडे सेलिब्रेशन करताना दीपक वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि मित्राला मिठी का मारली ? असा जाब विचारताच भूषण काळे या तरुणाने दिपक वाघमारे यांच्यावर चॉपरने हल्ला (Man attacked by Chopper) केला. या हल्ल्यातील संशयित भूषण काळे यांच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्षुल्लक कारणावरून जीवघेणे हल्ले
दरम्यान हा हल्ला निव्वळ मिठी मारल्याच्या शुल्लक कारणावरून झाला की काही पूर्ववैमनस्यातून झाला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, अगदी क्षुल्लक कारणावरून थेट जीवघेणे हल्ले करण्याची ही विकृती गेल्या अनेक दिवसांत तरुणांमध्ये वाढत आहे.

हेही वाचा -Child Marriage in Solapur : सोलापुरात 9 वर्षाच्या मुलीचा बालविवाह; नवरदेवासह चार जणांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details