महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vasant Panchami : जाणून घ्या... वसंत पंचमीला सरस्वती पूजनाचे विशेष महत्व - Special importance of Saraswati worship

शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी ( Magh Shuddha Panchami ) म्हणजे वसंत पंचमी ( Vasant Panchami ) होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस मानला जातो. मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने हा साजरा होतो. या दिवशी नृत्य, कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतूची चाहूल लागते. या बाबत पुजारी राजेश वाईकर यानी माहिती दिली.

Vasant Panchami
वसंत पंचमी

By

Published : Feb 5, 2022, 5:17 PM IST

Updated : Feb 5, 2022, 5:55 PM IST

नाशिक -शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी ( Magh Shuddha Panchami ) म्हणजे वसंत पंचमी ( Vasant Panchami ) होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस मानला जातो. मकर संक्रांतीनंतरसूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने हा साजरा होतो. या दिवशी नृत्य, कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतूची चाहूल लागते. या बाबत पुजारी राजेश वाईकर यांनी माहिती दिली.

पुजाऱ्यांची प्रतिक्रिया

वसंत पंचमीचे काय आहे पौराणिक महात्म्य?

अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्म देवाने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती, तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले, धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्‍या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला, तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीव- जंतूंना वाणी प्राप्त झाली, त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जातो अशी आख्यायिका आहे.

हेही वाचा -माघी गणेश जयंती : दगडूशेठ गणपतीला सकाळी स्वराभिषेक; जाणून घ्या माघी गणेश जयंतीचे महत्त्व

Last Updated : Feb 5, 2022, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details