येवला - तहसील ऑफीस निवडणूक शाखेतर्फे बी.एल.ओ मार्फत निवडणुकसंबंधी जे अभियान राबवले जाते. त्याचप्रमाणे लसीकरण मोहीम देखील राबवावी अशी मागणी सामजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
येवल्यात लसीकरण मोहीम निवडणुकीप्रमाणे राबवावी
तहसील ऑफीस निवडणूक शाखेतर्फे बी.एल.ओ मार्फत निवडणुकसंबंधी जे अभियान राबवले जाते. त्याच प्रमाणे लसीकरण मोहीम देखील राबवावी अशी मागणी सामजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवडणुकीप्रमाणे लसीकरण मोहीम राबवा.
निवडणुकीत मतदानासाठी जसे बुथ वापरतात. त्याचप्रमाणे लसीकरणालादेखील बूथ वापरावे. त्यासाठी बुथलेवल ऑफिसर त्या भागातील नगरसेवक अथवा ग्राम पंचायत, लसीकरण कर्मचारी , नाव नोंदणी अधिकारी असा ग्रुप तयार करून बूथवर लसीकरण राबवावे. म्हणजे सोशल डिस्टींन्सिंग होईल. तसेच बुथवर गर्दी कमी होईल. त्यासाठी रोज किमान २०० लोकांचे लसीकरण प्रत्येक बुथवर होईल अशा प्रकारे नियोजन करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना दिले.