महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये ओएलएक्सवर अमेरिकन आर्मीच्या नावाने गंडा घालण्याचा प्रयत्न - Nashik Crime News

ओएलएक्सअमेरिकन आर्मीच्या नावाने गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नाशिकच्या जागरूक युवतीमुळे आर्थिक नुकसान टळले.

नाशिकमध्ये ओएलक्सवर अमेरिकन आर्मीच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न

By

Published : Nov 9, 2019, 9:58 AM IST

नाशिक -नेहा गायकवाड या युवतीच्या जागरूकतेमुळे तिची होणारी आर्थिक फसवणूक टळली आहे. नेहा हिने भारतीय जुने चलन विक्रीसाठी ओएलएक्सवर ठेवले होते. तीला आम्ही अमेरिकन आर्मीचे अधिकारी असून आम्हाला संग्रहालयात नाणी ठेवण्यासाठी खरेदी करू इच्छित असल्याचे सांगत एक लाखा पर्यंत रक्कम देण्याची तयारी संशयितांनी दर्शवली. संशयितांनी नेहाच्या व्हाट्सअप नंबर वर बोलणे करत ही रक्कम आम्ही बँक खात्यात पाठवून, यासाठी नेहाच्या बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड, मेल आयडी मागितला. त्यांच्या बोलण्यावरून नेहाला संशय आल्यावर तिने पुढील व्यवहार करणे बंद केले. विशेष म्हणजे या संशयीत व्यक्तीच्या व्हाट्सअप प्रोफाईलवर अमेरिकन आर्मीच्या वेशातील फोटो ठेवण्यात आले होते.

नाशिकमध्ये ओएलक्सवर अमेरिकन आर्मीच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न

वरिष्ठ दर्जाच्या कोणत्याही पदावर कार्यरत असलेली व्यक्ती स्वतःच्या ओळखपत्राचे छायाचित्र कोणत्याही सोशल मीडिया किंवा ॲप्लिकेशन वर टाकत नाही, ही ओळखपत्रे बनावट देखील असू शकतात, त्यामुळे लोकांनी सावध होणं आवश्यक असल्याचे यबर फॉरेन्सिक तज्ञ तन्मय दीक्षित यांनी सांगितले. त्यामुळे अशा व्यक्तींशी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये ज्यामुळे तुमची आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता जास्त असल्याचे दीक्षित यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details