नाशिक : गेल्या काही दिवसापासून नाशिक शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकींच्या चोऱ्या होत आहेत. या विरुद्ध पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी मोटर सायकल चोरी प्रतिबंध विशेष पथक स्थापन ( Motor Cycle Theft Prevention Special Squad ) करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व मोटार सायकल चोरी प्रतिबंध पथकातील अंमलदार यांनी संयुक्त गोपनीय माहिती काढून दुचाकी गाड्या चोरणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून दहा मोटारसायकली व दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे ( Senior Police Inspector Anil Shinde ) व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
Nashik Crime : नाशिक शहरात दुचाकी चोरट्यांना अटक; दहा मोटरसायकली जप्त - Mumbai Naka Police Station
गेले काही दिवसांपासून नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने नाशिक शहर पोलीस ( Nashik City Police ) आयुक्तालयाच्या वतीने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती केली होती. पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत चोरीला गेलेल्या तब्बल १० दुचाकी आणि ४ आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक :संशयित आरोपी अजय प्रवीण दहेकर ( वय २२ ) राहणार पाथर्डी फाटा नाशिक, अमोल बाळू इंगळे (२३) राहणार म्हाडा कॉलनी पाथर्डी फाटा अंबड, यांना विधी संघर्षित बालकासह कुकरी सारखे हत्यार जवळ बाळगताना पकडल्यानंतर या तपासात आरोपीचा साथीदार विजय प्रल्हाद आव्हाड ( वय २० ) गणेश चौक सिडको, यास ताब्यात घेतल्यावर त्याचे कडून दोन मोबाईल आठ मोटारसायकली असा ऐकून दोन लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशन कडील गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज मधील वर्णनाप्रमाणे माहिती काढून आरोपी निलेश बापू बेलदार ( २१ ) राहणार देवळाली गाव, याला अटक करण्यात आली. त्याच्या कडून दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :Yeola Political News : येवल्यात युवासेनेला धक्का; पदाधिकारी शिंदे गटात दाखल