नाशिक - सराईत गुन्हेगार बाबा शेख याच्यावर गोळीबार करून हत्या केल्या प्रकरणी दोघा संशयितांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगार बाबा शेख मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर गोळीबार झाला. यामध्ये त्याची हत्या झाली.
नाशिक : गुन्हेगार बाबा शेख गोळीबार प्रकरणी दोन संशयितांना अटक
सराईत गुन्हेगार बाबा शेखवर झालेल्या गोळीबाराप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या गोळीबारात बाबा शेखचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर संशयित आरोपी फरार होते. संबंधित घटनेचा तपास उपनगर पोलिसांसह शहरातील गुन्हे शोध पथक देखील करत होते. अखेर या तपासाला यश आले आहे. अवघ्या काही तासांतच मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने अर्जुन पिवाल याला शहरातील गंगापूर भागातून अटक केली आहे. तसेच दुसरा संशयित अमीर उर्फ शमीन खान उर्फ मुर्गीराजा याला देखील धुळ्यातील एका लॉजवरून ताब्यात घेण्यात आले आहे. धुळ्यातील अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या टीमने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोण आहे बाबा शेख?
बाबा शेख याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार केला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. सराईत गुन्हेगार बाबा शेखवर मारहाण, हत्या, लूट, चोऱ्या, नगरसेवकांना धमक्या देणे, दहशत पसरवणे, आदी. गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.