महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक - घंटागाडी अंगावरून गेल्याने 20 वर्षांच्या मुलीचा मृत्यू - satpur accident news

घंटागाडी अंगावरून गेल्याने 20 वर्षीय युवती ठार झाल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली.सातपूर औद्योगिक वसाहतीत नादुरुस्त ट्रॉली 'टो' करून नेत असताना हा झाला अपघात झाला आहे.

girl crashed under garbage van
नाशिक - घंटागाडी अंगावरून गेल्याने 20 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

By

Published : Dec 17, 2020, 4:41 PM IST

नाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये घंटागाडी अंगावरून गेल्याने 20 वर्षीय युवती ठार झाल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. नादुरुस्त ट्रॉली 'टो' करून नेत असताना हा झाला अपघात झाला आहे.

नाशिक - घंटागाडी अंगावरून गेल्याने 20 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
मित्रासोबत जॉगिंगसाठी घराबाहेर पडलेल्या 20 वर्षीय रोशनी जयस्वाल या मुलीच्या अंगावरून घंटागाडी गेल्याने तिचा मृत्यू झाला. संबंधित घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. सातपूर भागातील ग्लॅन मार्क कंपनी गेट जवळ हा अपघात झाला आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास रोशनी जयस्वाल ही आपल्या मित्रांसोबत जॉगिंगला गेली होती. यावेळी जवळून जात असलेल्या घंटागाडीला नादुरुस्त ट्रॉली टो लावून नेण्याचे काम सुरू होते. मात्र चालकाचा ताबा सुटल्याने कचरा ट्रॉली रोशनी आणि तिच्या मित्राच्या अंगावरून गेली. यात रोशनीच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच तिच्या मित्राला देखील दुखापत झाल्याने उपस्थितांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान रोशनीचा मृत्यू झाला.
घंटागाडी अंगावरून गेल्याने 20 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
दोघे संशयित सातपूर पोलिसांच्या ताब्यातदरम्यान घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच घंटागाडी चालक आणि इतर एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details