नाशिक- नांदगाव येथील कांदा चाळीला लागलेल्या आगीत ३ हजरा क्विंटल कांदा जळून खाक झाला. आज (शुक्रवारी) दुपारी ही घटना घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नांदगाव येथे कांदा चाळीला लागलेल्या आगीत ३ हजार क्विंटल कांदा जळून खाक
आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या कांदाचाळी शेजारीच काही घरे आहेत. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
नांदगाव-मालेगाव महामार्गावर साहेबराव खैरनार यांच्या ३ कांद्याच्या चाळी आहेत. त्यांनी २ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांकडून ३ हजार क्विंटल कांदा खरेदी करून चाळीत साठवून ठेवला होता. आज दुपारी त्यातील एका चाळीला आग लागली. ही आग इतर दोन्ही चाळीपर्यंत पसरली.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव आणि मनमाडचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत तिन्ही कांदाचाळी जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कांदाचाळी शेजारीच काही घरे आहेत. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.