महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नांदुरमध्यमेश्वर पुलावरुन पाणी! वाहन चालकांचा जीव घेणा प्रवास सुरूच - Traffic on Nandurmadhyameshwar bridge

नाशिकच्या नांदुरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ( Traffic on Nandurmadhyameshwar Bridge ) या भागातील खांनखाव-दडी जोडणी पुल नॅशनल हायवे क्रमांक २७ हून पाणी वाहत असताना काही वाहन चालक मात्र जीव धोक्यात घालून या पुलावरून वाहने घेऊन जात आहेत.

नांदुरमध्यमेश्वर पुल
नांदुरमध्यमेश्वर पुल

By

Published : Jul 14, 2022, 3:59 PM IST

नाशिक - राज्यात अनेक ठिकाणी अशा अतिउत्साही लोकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून हा पूल वाहतुकीसाठी बंद करणे अपेक्षित असताना अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी सुरू असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने वाहतूक थांबबावी अशी आशा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वाहन चालकांचा जीव घेणा प्रवास सुरूच

पुराच्या पाण्यातून पुलावरून मार्ग काढत आहेत - नांदूर नांदुरमध्यमेश्वर येथून ५० हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पुराच्या पाण्यात वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये लोकांना जीव देखील गमावा लागला आहे. दरम्यान, असे असतानादेखील काही नागरिक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या जीवाची परवा न करता पुराच्या पाण्यातून पुलावरून मार्ग काढत आहेत. त्यामुळे वेळीच प्रशासनाने हे पूल वाहतुकीसाठी बंद करणे गरजेचे आहे.

पाणीसाठा -

  • दारणा धरण ६५. ७६ टक्के
  • मुकणे धरण ६५.२५
  • वाकी धरण ३१.९८
  • भाम धरण ६०.३५
  • भावली धरण ९१.४९
  • वालदेवी धरण ८७.३८
  • गंगापूर धरण ६२.६३
  • कशपी धरण ६०.५८
  • कडवा धरण ६९.४३
  • आळंदी धरण १००
  • भोजापुर धरण ६५.१०
  • पालखेड धरण ४९.१६
  • करंजवण धरण ८०.९७
  • ओझरखेड धरण १००
  • वाघाड धरण १००
  • तिसगाव धरण ९० .९९
  • पुणेगाव धरण ७७.६९
  • चनकापूर धरण ५५.०९
  • हरणबारी धरण १००
  • केळझर धरण १००
  • नागासाका धरण 3.78

१३ जुलै रोजी नाशिक शहरात तसेच धरण परिक्षेत्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे. वाघाड ओझरखेड पाठोपाठ केळझर धरण देखील आता ओव्हर फ्लो झाले असून, वाल देवी धरण हे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. आज देखील शहरात पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित धरण देखील शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा -Made a Raincoat For The Goat: शेळ्यांची अशीही काळजी! रिकाम्या प्लॅस्टिकच्या गोणीचे शिवले रेनकोट

ABOUT THE AUTHOR

...view details