महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक जिल्ह्यात 10 महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मागील 10 महिन्यापासून शाळा बंद होत्या. आज तब्बल 10 महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली आहे. पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 267 शाळा सुरू झाल्या.

नाशिक जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू
नाशिक जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू

By

Published : Jan 4, 2021, 5:53 PM IST

नाशिक -नाशिक जिल्ह्यातील सरकारी तसेच खासगी शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात 9वी ते 12वी चे वर्ग सुरू करण्यात आले. तसेच कोरोनाची लढाई आता अंतिम टप्यात आल्याचं मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केलं आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे

पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 2 हजार 267 शाळा सुरू-

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मागील 10 महिन्यापासून शाळा बंद होत्या. आज तब्बल 10 महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 2 हजार 267 शाळा सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी शाळांचे 9वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात आले. या निर्णयाला आज पहिल्या दिवशी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील चांगला प्रतिसाद देत शाळेत 40 ते 45 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. नाशिकच्या शासकीय कन्या शाळेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्क वाटण्यात आले. तसेच कोरोना काळात शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोनाची लढाई अंतिम टप्यात-

"नाशिक जिल्ह्यात अनलॉकमध्ये सुरवातीला उद्योग धंदे नंतर जिम सुरू करण्यात आले. आता आम्ही पुढचे पाऊल टाकत शाळा सुरू केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेने ऑनलाइन शिक्षण देण्याचा चांगला प्रयत्न केला. आता शाळा सुरू झाल्याने पालक तसेच विद्यार्थी देखील समाधानी आहेत. आज पहिल्याच दिवशी शासकीय कन्या शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 65 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. येत्या काही काळत हा आकडा वाढेल. शाळा देखील विद्यार्थ्यांची चांगली काळजी घेत असून शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची टेम्प्रेचर, ऑक्सिजन चेक करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना मास्क घालूनच वर्गात प्रवेश दिला जात आहे. कोरोनाशी लढाई अंतिम टप्यात आहे," असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

हेही वाचा-ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात; ऑक्सफोर्डच्या लसीचा वापर

ABOUT THE AUTHOR

...view details