नाशिक- आज सूर्यग्रहण आहे. त्यामुळे विविध मंदिर आणि धार्मिक स्थळांवर विशेष मंत्रपठण आणि पूजा पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातीाल ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिरातही सूर्य ग्रहण काळात जलाभिषेक करण्यात आला.
नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिरात सूर्यग्रहण काळात जलाभिषेक - सूर्यग्रहण काळात कपालेश्वर जलाभिषेक
मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पुरोहितांकडून जलाभिषेक, रुद्र आवर्तन, महा मृत्युंजय जप आदी धार्मिक विधी केले गेले. अनेक वर्षांनंतर येणाऱ्या या खंडग्रास ग्रहणाचा मानवी शरीरावर आणि मनावर परिणाम जाणवतो. मात्र महादेवाच्या दर्शनाने ग्रहणाचे अरिष्ट दूर होऊन पुण्य प्राप्ती होते, अशी धार्मिक भावना आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळेत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होते. मात्र मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पुरोहितांकडून जलाभिषेक, रुद्र आवर्तन, महा मृत्युंजय जप आदी धार्मिक विधी केले गेले. अनेक वर्षांनंतर येणाऱ्या या खंडग्रास ग्रहणाचा मानवी शरीरावर आणि मनावर परिणाम जाणवतो. मात्र महादेवाच्या दर्शनाने ग्रहणाचे अरिष्ट दूर होऊन पुण्य प्राप्ती होते, अशी धार्मिक भावना आहे. त्यामुळे आजच्या पूजेला महत्व असल्याचे सांगितले जात आहे.
भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. याला अध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व दिले जाते. शास्त्रामध्ये महादेव हे सर्व शक्तींचे व रोगाचे निवारण करणारे मानले जातात. त्यातच सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट आहे. तेव्हापासून देशभरातील सर्वच मंदिर बंद आहेत. त्यामुळे कोरोना सारखी महामारी नष्ट व्हावी, यासाठी ग्रहण काळात मंदिरात सतत जलाभिषेक केला जात असल्याची माहिती स्थानिक पुजारी अतुल शेवाळे यांनी दिली आहे