नाशिक- गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये गारवा निर्माण झाला असून आज नाशिक या हंगामातील सर्वात कमी (11.4 से.) तापमानाची नोंद करण्यात आली.
नाशिकचा पारा 11.4 अंशांवर; हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद - low temperature in nashik
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये गारवा निर्माण झाला असून आज नाशिक या हंगामातील सर्वात कमी (11.4 से.) तापमानाची नोंद करण्यात आली.
नाशिक शहरासह जिल्हाभरात कडाक्याची थंडी पडली असून हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाचा पारा 14 अंशांवरून घसरुन थेट 11.4 अंशांवर खाली आला आहे. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत. सुरूवातीला रात्री वाजणारी थंडी आता दुपारी देखील जाणवत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर वातावरणात बदल निर्माण झाला होता. कालच्या ग्रहणानंतर हंगामातील कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. पुढील काही दिवस तापमान अजून खाली येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.