नाशिक लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी नाशिकचे ढोल पथके सज्ज Dhol Pathak ready for Ganeshotsav झाली आहे. नाशिक सह मुंबई, सुरत, हैद्राबाद, उज्जेन याठिकाणी नाशिकचे ढोल पथके आपली कला सादर करणार आहे. या ढोल पथकात युवक युवतींसह, चिमुकल्या कलाकारांचा देखील सहभाग असणार आहे. पारंपरिक वाद्याचा समावेश असलेल्या या ढोल पथकाच्या वादनामुळे, गणेशोत्सवाला एक वेगळेच वलय प्राप्त sound of the dhol Pathak reverberate झाले आहे. नाशिक शहरात गणेशोत्सवासाठी 40 हुन अधिक ढोल पथक सज्ज झाले आहे. गणपती आगमन सोहळा व विसर्जन मिरवणुकीत ढोल पथक वादन करणार आहेत.reverberate in all four directions Dhol Pathak
ढोल तालांची मोहीम नाशिक शहरातील ढोल पथकांकडून 30 बीट, आठ बीट, नाशिक ढोल, रामलखन, कृष्णा, ट्रेन, गोविंदा ढोलीबाजा, शिवस्तुती, संबळ, वक्रतुंड, भीमरूपी, लायकारी गरबा या वादनाच्या तालांची वाद्यप्रेमी मोहिनी घालतील. या ढोल पथकात ढोल, ताशा, टोल, झांज आणि मिरवणुकीची व हिंदू धर्माची शान वाढवणारा भगवा ध्वज नाचवला जातो.
नाशिकचे प्रसिध्द शिवराय वाद्य पथकशिवराय वाद्य पथकाचा इतिहास पाहिला तर, आज वर त्यांनी फक्त महाराष्ट्रच नाही तर दिल्लीतील संसद भवन सुद्धा गाजवले. त्या शिवाय हरिद्वार येथील कुंभमेळा मध्ये वादनरुपी सेवा करण्याचा मान ही शिवराय वाद्य पथकाने पटकावला आहे.
नाशिक मधील मानाचा चौथा गणपती श्रीमंत श्री साक्षी गणेश भगवान यांच्या चरणी, दरवर्षी विसर्जन मिरवणूक करण्याचा मान त्यांनाच मिळतो.
मुंबई मधील अतिशय प्रसिद्ध असलेला चिंचपोकळीच्या चिंतामणी साठी सुद्धा वादन रुपी सेवा या वाद्य पथकानेदिलेली आहे. मागील वर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीने 100 व्या वर्षात पदार्पण केले.