नाशिक -शहरातील संभाजी चौक परिसरातील शेकडो वर्ष जुना असलेल्या बोरसे वाड्याचा काहि भाग शुक्रवारी कोसळला. पोलिस आणि अग्निशामक दल यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. वाड्याची भिंत आणि छताचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने या वाड्यातील सर्व रहिवासी सुखरुप आहेत.
नाशिकमधील शेकडो वर्ष जुन्या बोरसे वाड्याचा काही भाग कोसळला - महापालिका
नाशिकात जुने वाडे यांचे पडण्याचे सत्र सुरुच आहे. शुक्रवारी संभाजी चौक परिसरातील बोरसे वाड्याचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नाशिकमधील शेकडो वर्ष जुन्या बोरसे वाड्याचा काही भाग कोसळला
पावसाच्या संततधारेमुळे जुने जीर्ण वाडे वारंवार पडत आहेत
नाशिकमध्ये पावसाच्या संततधारेमुळे जुने वाडे, त्यांच्या जीर्ण झालेल्या भिंती वारंवार पडत आहे. शुक्रवारी लचके यांचा माती व विटांनी बांधलेला जुना बोरसे वाड्याच्या काही भाग पडला आहे. नाशिकमधील जुने वाडे पडण्याचे सत्र सुरूच असून आज नाशकात वाडा कोसळण्याची ही दहावी घटना आहे. तरी महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही, अशी माहीती येथील रहिवासी संजय भास्करे यांनी दिली आहे.