महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सारस्वतांच्या मेळ्यात शरद पवारांची हजेरी, संमेलन नगरीची केली पाहणी - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

नाशिक येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiy Marathi Sahitya Sammelan Nashik) होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे जमलेल्या सारस्वतांच्या मेळ्याला हजेरी लावली आहे. कुसुमाग्रज साहित्य संमेलन नगरीची (Kusumagraj Sahitya Sammelan Nagari) पाहणी करत त्यांनी येथील विविध स्टॉलला भेटी दिल्या.

शरद पवार
शरद पवार

By

Published : Dec 5, 2021, 1:31 PM IST

नाशिक :नाशिक येथे यंदा ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiy Marathi Sahitya Sammelan Nashik) भरले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे साहित्य संमेलन नगरीत दाखल झाले असून, संमेलन नगरीची ते पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबत संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आहेत.

शरद पवार यांनी कुसुमाग्रज नगरी येथे येऊन साहित्यिकांची भेट घेतली.


छगन भुजबळ व समीर भुजबळ यांनी दिली माहिती
मागील दोन दिवसांपासून भुजबळ नाॅलेज सिटित (Bhujbal Knowledge City) अखिल भारतीय ९४ वे साहित्य संमेलनात सारस्वतांचा मेळावा भरला आहे. विविध कार्यक्रम, परिसंवाद, बालकट्टा, गजल आदी कार्यक्रमांनी संमेलनात रंग भरले आहे. आज संमेलनाचा समारोप खा.शरद पवार यांच्या भाषणाने होणार आहे. खा.पवार त्यासाठी काल रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले. सकाळीच त्यांनी संमेलनस्थळाची पाहणी केली. संमेलन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना संमेलनाची माहिती दिली.

शरद पवारांनी साहित्य संमेलनाला भेट दिली. यावेळी स्वागताध्यक्ष भुजबळांनी त्यांना माहिती दिली.

फडणवीसांच्या अनुपस्थितीची चर्चा

दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) हे नुकतेच नाशिक दौऱ्यावर आले होते. मात्र, त्यांनी संमेलनस्थळी जाण्याचे टाळले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Swatantryaveer Savarkar) नाव साहित्य संमेलन नगरीला देण्याची मागणी होत होती. मात्र, नाव न देण्यात आल्याने फडणवीस यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त केली होती. 'मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तेथे जाऊन तरी काय करायचे?' असं फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होत.

ABOUT THE AUTHOR

...view details