महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्थाच्या नावाने दुकानदारी सुरू - शरद पवार - inaugurate

लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा अनावरण समारंभ शरद पवार यांच्या हस्ते पार पडला.

शरद पवार

By

Published : Mar 3, 2019, 6:06 PM IST

नाशिक - महाराष्ट्रात आज गरजेपेक्षा जास्त संस्था उभा राहिल्याने संस्था चालविणे अत्यंत कठीण झाले आहे. उत्तम शिक्षण दिले, दर्जा उत्तम ठेवला तर त्या ठिकाणी विद्यार्थी कमी पडणार नाहीत. मात्र, महाराष्ट्रात सध्या काही अभियांत्रिकी संस्थांनी केवळ शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडला आहे. त्यामुळे यासाठी समाजाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांमधून अधिक उद्योजक कसे घडतील यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा अनावरण समारंभ शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार पब्लिक स्कुलच्या वतीने संस्थेसाठी वसंतराव नाईक शिष्यवृत्ती आणि गोपीनाथ मुंडे शिष्यवृत्ती घोषणा करून प्रत्येकी २५ लाख रुपये त्यांनी देणगी देण्याची घोषणा केली.

महाराष्ट्रात अनेक दृष्ट्या नेत्यांची शिक्षणाची चळवळ उभी केली. पुढच्या पिढीला शिक्षण देण्यासाठी त्यांनी विविध संस्थांची निर्मिती केली. त्यामध्ये वसंतराव नाईक शिक्षण संस्थादेखील आहे. यामध्ये आर्थिक ताकद उभी करण्याचे काम डोंगरे यांनी केले. त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून अधिक बळकटी मिळाली. या संस्था उभ्या करण्यासाठी कष्टकरी व शेतकरी वर्गाचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, समीर भुजबळ खासदार असताना ओबीसींची जनगणना करण्याची मागणी घेऊन मुंडे यांच्याकडे गेले. त्यावेळेस त्यांनी पाठींबा दिला. यासाठी मुंडे यांनी स्वतःच नेतृत्व करत सातत्याने पाठपुरावा केला. मात्र अद्याप हा प्रश्न प्रलंबित असून मित्र गोपीनाथ मुंडे यांचे राहिलेले अधुरे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन असेही भुजबळ यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ऊसतोड कामगारांचे प्रश्न घेऊन राज्यात नेतृत्व केले त्यांचा पुतळा आज संस्थेत बसविण्यात आले आहे. ही अत्यंत गौरवाची बाब असून त्यांचे विचार येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील. ज्या प्रमाणे मुंडे यांच्याकडून राजकारणात वारसा मिळाला,त्याचप्रमाणे शरद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, दीपस्तंभाप्रमाणे असलेले व्यक्तिमत्व क्रांतिवीर वसंतराव चव्हाण यांचे कार्य आजच्या पिढीला आदर्श व्यक्तीमत्व आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या संस्थेचे उद्घाटन लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते होते ही ऐतिहासिक घटना आहे. लोकशाही व्यवस्था टिकविण्यासाठी ज्या मार्गाने काम करावे लागते ते काम गोपीनाथ मुंडे यांनी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details