महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये सराफाचे अपहरण करून लुटले सात लाख रुपये - Rs 7 lakh looted from jewelers shop in Nashik

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बेरा अंबड येथील सराफ दुकानातून दुचाकीवरून घरी जात होता. तेव्हा दुचाकीवरून जाणाऱ्या तीन संशयितांनी रस्त्यात दुचाकी थांबवत ठार मारण्याची धमकी दिली. आणि स्वराज नगर परिसरातील जंगलात घेऊन गेले. जंगलात नेऊन तलवारीचा धाक दाखवला.

सात लाखांची लूट..
सात लाखांची लूट..

By

Published : Aug 6, 2021, 12:56 PM IST

नाशिक -सराफ व्यवसायिक संजय बेरा यांचा पाठलाग करत तलवारीचा धाक दाखवून सात लाखांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बेरा अंबड येथील सराफ दुकानातून दुचाकीवरून घरी जात होता. तेव्हा दुचाकीवरून जाणाऱ्या तीन संशयितांनी रस्त्यात दुचाकी थांबवत ठार मारण्याची धमकी दिली. आणि स्वराज नगर परिसरातील जंगलात घेऊन गेले. जंगलात नेऊन तलवारीचा धाक दाखवला. आणि तसेच खिशातील रक्कम आणि बॅग मधील 32 ग्रॅम वजनाचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यापैकी एकाने खिशातील दुकानाची चावी घेत दोघांनी संजय यांना बांधले. आणि जोन्याच्या दुकानात जाऊन 72.5 ग्रॅमचे दागिने लुटले. तसेच पोलीसात गेलास तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. व पळ काढला. नंतर संजय बेरा यांनी नागरिकांच्या मदतीने पोलिसात संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. तसेच इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांचा वाचक कमी
नाशिक शहरात मागील चार महिन्यापासून चोरी, घरफोड्या, हाणामाऱ्या,चेन स्नॅचिंग आदी घटना मध्ये मोठी वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कमी झाल्याचं नागरिकांचं म्हणण आहे.

हेही वाचा -Tokyo Olympics : रणरागिणी अखेरपर्यंत लढल्या! महिला हॉकी संघाचे कास्य पदकाचे स्वप्न भंगले

ABOUT THE AUTHOR

...view details