महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक जिल्ह्यातील बंद असलेले साखर कारखाने सुरु करा; राजू शेट्टी यांची मागणी

नाशिक जिल्ह्यातील बंद असलेले साखर कारखाने ( Sugar Factory ) सुरु करण्याची मागणी राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी केली. ज्याप्रमाणे वर्षातून एकदा ऊस परिषद होते. त्याचप्रमाणे द्राक्ष सीझनला देखील द्राक्ष परिषद घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. ऊस व द्राक्ष परिषदेत ते बोलत होते.

Raju Shetty
राजू शेट्टी

By

Published : Nov 26, 2021, 1:36 PM IST

निफाड ( नाशिक ) - नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादक व द्राक्ष उत्पादक ( Sugar Cane Growers And Grape Growers) यांची होणारी हाल थांबावी यासाठी ऊस व द्राक्ष परिषदेचे आयोजन निफाड तालुक्यातील करंजगाव येथे राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील बंद असलेले साखर कारखाने सुरु करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी यांची नाशिकमधील साखर कारखाने सुरु करण्याची मागणी

ऊस व द्राक्ष परिषद -


निफाड तालुक्यात 11 टन उसाचे उत्पादन होत असून या तालुक्यामध्ये तीन साखर कारखाने असून फक्त एकच साखर कारखाना ( Sugar Factory ) चालू आहे. यामुळे फक्त 3 टन उसाचे गाळप होत आहे. बाकी 8 टन उसाच्या गाळपसाठी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहण्याची वेळ निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना येत असल्याने नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून उसाला एफआरपी प्रमाणे भाव मिळावा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फरपट थांबावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करंजगाव येथे ऊस व द्राक्ष परिषद माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू करा -

नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा ऊस गाळप मोठी समस्या असून निफाड तालुक्यामध्ये उत्पादन जास्त आहे. मात्र, साखर कारखाने कमी असल्याने त्यात एक कप साखर कारखाना चालू असून बाकी साखर कारखाने सुरु व्हावे याकरीता स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्न करत करत असते. त्यातीलच एक भाग म्हणजे रानवड साखर कारखाना चालू करण्यात आम्हाला यश आले आहे. बाकी उरलेले साखर कारखाने चालू झाले, तर नक्कीच त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होईल, असे राजू शेट्टी म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व ऊस परिषद होत असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लावलेल्या उसाच्या गाळप कसा करावा ही मोठी समस्या आहे. नाशिक जिल्ह्यातील बाकी साखर कारखाने चालू झाले, तर नक्कीच शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल. नगर जिल्ह्यातून जे साखर कारखाने उस घेतात, ते शेतकऱ्यांची लूट करून कमी किमतीत ऊस घेऊन जातात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बंद असणारे साखर कारखाने चालू करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे शेट्टी म्हणाले.

द्राक्ष सीझनला देखील द्राक्ष परिषद घेणार -


द्राक्ष व बेदाणेबाबत जी फसवणूक होती. त्याबद्दल राजू शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले, की बाहेर राज्यातून द्राक्ष व बेदाणे खरेदीसाठी जे व्यापारी येतात. त्यांना परवाने देण्यात यावे. तसेच त्यांच्याकडून बँक गॅरंटी घ्यावी. जेणेकरून त्यातून शेतकऱ्यांचे पैसे देता येतील. ज्याप्रमाणे वर्षातून एकदा ऊस परिषद होते. त्याचप्रमाणे द्राक्ष सीझनला देखील द्राक्ष परिषद घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

हेही वाचा -Sting Operation : आमदार मंगेश चव्हाण यांनी लाचखोर पोलिसांची केली पोलखोल; पोलिसांनी काढला पळ

ABOUT THE AUTHOR

...view details