नाशिक - कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर सध्या शाळांमधून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी वेगवेगळे माध्यम वापरले जात असले तरी त्यात अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परिणामकारकरित्या अध्ययन व अध्यापन करता यावे या हेतूने नाशिकच्या 'इस्पॅलियर स्कूल'ने अभिनव प्रयोग सुरू करत ऑनलाइन रेडिओ स्कूलची निर्मिती केली आहे.
ऑनलाइन शिक्षणाला पर्याय देत विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा आणि सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचावे, म्हणून तयार केलेल्याया रेडिओवरती 'प्री प्रायमरी' ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे तब्बल अडीच हजार भाग (एपिसोड) रेकॉर्ड करून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 24 जूनपासून सुरू झालेल्या या रेडिओच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्याचे अभ्यासक्रम तसेच शालेय शिक्षणाचे धडे रेडिओवर ऐकलेले आहेत. एवढेच नव्हे तर कुटुंबातील पालक तसेच इतर सदस्यांनीही या रेडिओचा माध्यमातून सामान्य ज्ञानासह इतर माहिती जाणून घेतली आहे. ऑनलाइन रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याचा प्रयोग करणारी 'इस्पॅलियर स्कूल' देशातील पहिली शाळा ठरली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेने स्कूल रेडिओची निर्मिती केली. शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थी डिझाईन फॉर चेंज या प्रकल्प अंतर्गत (डीएफसी) दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. या विद्यार्थ्यांच्या कल्पनेनुसार आता हा स्कूल रेडिओ आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षकांसोबत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः विविध ऑडिओ क्लिप्स या आदिवासी बांधवांसाठी बनवल्या आहेत. राज्यात साधारण आठ लाख आदिवासी विद्यार्थी आहेत. त्यातील तीन ते चार लाख विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहेत. त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा रेडिओ उपलब्ध करून दिला जाणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना रेडिओद्वारे मिळणार शिक्षणाची संधी...वाचा सविस्तर - radio education for tribals
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेने स्कूल रेडिओची निर्मिती केली. शाळेतील इयत्ता आठवीचे विद्यार्थी डिझाईन फॉर चेंज या प्रकल्प अंतर्गत (डीएफसी) दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. या विद्यार्थ्यांच्या कल्पनेनुसार आता हा स्कूल रेडिओ आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
रेडिओद्वारे शिक्षण
हेही वाचा -पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज चेन्नई ते पोर्ट ब्लेअर सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल लिंकचे उद्घाटन
असा आहे स्कूल रेडिओ -
हेही वाचा -राज्यातील 'पाणी व स्वच्छता मिशन'मधील तीन हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार