नाशिक - राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर असून, बुधवारी(दि.९ऑक्टोबर)ला संध्याकाळी ते ओझर विमानतळावरुन शहरातील विश्रामगृहात दाखल झाले आहेत. प्रत्येक चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, राष्ट्रपती येणार असल्याने शहराला छावणीचे रूप आले आहे.
राष्ट्रपती कोविंद दोन दिवस नाशिक दौऱ्यावर; रुद्र-नाद संग्रहालयाचे करणार उद्घाटन - रुद्र-नाद संग्रहालय
राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर असून, बुधवारी(दि.९ऑक्टोबर)ला संध्याकाळी ते ओझर विमानतळावरुन ताफ्यासह शहरातील विश्रामगृहात दाखल झाले आहेत.
गुरुवारी(दि,१० ऑक्ट)ला गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन केंद्रात राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजप्रदान कार्यक्रम होणार आहे. तसेच यानंतर त्यांच्या हस्ते देवळालीच्या मुख्यालयातील तोफखाना केंद्रात उभारलेल्या 'रुद्र नाद' संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. हे संग्रहालय तोफखान्याच्या इतिहासाची साक्ष देणारे आहे.
यावेळी देवळालीत संचलन पार पडणार असून, लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह युद्धभूमीवर शौर्य गाजवणाऱ्या वैमानिकांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.