महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये अज्ञातांकडून बाप-लेकाची हत्या - crime in nashik

इगतपुरी तालुक्यातील खुर्द येथे बापलेकाची हत्या करण्यात आली. अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली.

nashik
बाप-लेकाची हत्या

By

Published : Nov 30, 2019, 6:08 PM IST

नाशिक- इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथे शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास बाप आणि लेकाची अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आली. काशीराम वामन फोकणे (वय ६५), ज्ञानेश्वर काशीराम फोकणे (वय ४५) अशी बाप लेकांची नावे आहेत. याबाबत वाडीवऱ्हे पोलिसांत अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर फोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी आहेत. ते इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द या अत्यंत छोट्या गावी राहतात. ज्ञानेश्वर फोकणे हे पत्नी आणि तीन मुले यांच्यासह राहत होते. मळ्यात त्यांची शेती असून वडील काशीराम फोकणे हे एकटे मळ्यात राहायचे. ज्ञानेश्वरचा घोटी रोडवरील एसएमबीटी कॉलेज परिसरात हॉटेल व्यवसाय असल्याने त्यांचे सर्व कुटुंब तेथे राहते. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ज्ञानेश्वर हा वडिलांना जेवणाचा डबा घेऊन मळ्यात आला होता. मात्र, रात्री दीड वाजेच्या सुमारास त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याची हत्या केली. यावेळी त्याचे वडील काशीराम फोकणे यांचीही निर्घृण पणे हत्या करण्यात आली. सकाळी ही घटना लक्षात आल्यावर वाडीवऱ्हे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर तपासला वेग देत त्यांच्याकडून अज्ञात संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. ज्ञानेश्वर फोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असल्याने ह्या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details