नाशिक - विविध कलांचा संगम असलेला स्वर पालवी, सन्मान दशकांचा या कार्यक्रमानं नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. एकाच मंचावर दहा कला आणि 47 महिला कलाकारांचा संच, उत्तम कलाकृतीसह आगळावेगळा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. बाबाज थिएटर्स आणि सुवर्णा क्षीरसागर यांच्या स्वरांजली संगीत या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्वर पालवी सन्मान दशकांचा हा कार्यक्रम परशुराम सायखेडकर नाट्यगृहात पार पडला.
नाशिकमध्ये एकाच मंचावर 47 महिला कलाकारांचा कलाविष्कार..
संगीत, नृत्य, हार्मोनियम, कीबोर्ड, गिटार,सतार,बासरी तबला, साईड रिदम, कथ्थक,भरतनाट्यम, कवित्री,लेखिका, अभिवाचन, चित्रकार,शिल्पकार ,निवेदन रांगोळी, चलचित्र व्हिडिओ आदी क्षेत्रातील 40 हून अधिक महिला कलाकारांनी सहभाग घेतला होता.
नाशिकमध्ये एकाच मंचावर 47 महिला कलाकारांचा कलाविष्कार
'या' कलांचा होता समावेश - संगीत, नृत्य, हार्मोनियम, कीबोर्ड, गिटार,सतार,बासरी तबला, साईड रिदम, कथ्थक,भरतनाट्यम, कवित्री,लेखिका, अभिवाचन, चित्रकार,शिल्पकार ,निवेदन रांगोळी, चलचित्र व्हिडिओ आदी क्षेत्रातील 40 हून अधिक महिला कलाकारांनी सहभाग घेतला होता.
Last Updated : May 8, 2022, 4:40 PM IST