नाशिक - गणेशाचे आगमन होऊन 3 दिवस उलटून गेले असले, तरी शहरातील सर्वच गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या वैविध्यपूर्ण देखावे आणि आकर्षक मूर्ती शहराचे वैशिष्ट्य असल्याचे दिसून येत आहे.
नाशिकातील गणेश मंडळाचे देखावे बघण्यासाठी भाविकांची गर्दी; सर्जिकल स्ट्राईकचा विशेष देखावा - decoration in nashik city
गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाशकात साकरण्यात आलेल्या देखाव्यांना नागरिक चांगलीच पंसती देत आहेत. दरम्यान सर्जिकल स्ट्राईकच्या साकरण्यात आलेल्या देखाव्याला लोक जास्त पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा -आमच ठरलंय... शिवसेना- भाजपचा प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री - रामदास कदम
नाशिक शहरात विविध पारंपरिक गणपती देखावे साकारण्यात आले आहेत. मात्र. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर भारतीय सैन्याने केलेले सर्जिकल स्ट्राईकाचा देखावा' बघण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. दरम्यान, शहरात यंदा १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ६९५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी श्रींची विधिवत प्रतिष्ठापना केली आहे. मोठ्या गणेश मंडळांनी यंदाही गणपतीच्या भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याला प्राधान्य दिले आहे.