नाशिक -मंत्रिपदाच्या वाटपाबाबत सर्व समाधानी आहेत. उगाच भांडणे लावू नयेत. मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिपदापासून प्रितम मुंडे (Pankaja munde) यांना दूर ठेवल्याबाबत त्यांनी मौन पाळण्याचा सल्ला दिला. तर नारायण राणे (narayan rane) त्यांच्या कार्यक्षमतेमुळे मंत्रीमंडळात आहेत, असेही ते म्हणाले. नाशिक शहर बस शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा -'देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची राज्याला खूप गरज आहे'
‘मी ईडीचा प्रवक्ता नाही’,
तुम्ही ईडी(enforcement directorate)ची चौकशी लावाल तर मी सीडी लावेल, असा इशारा देत भाजपाची वाट सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर गेलेल्या एकनाथ खडसे (eknath khadse) यांना गुरुवारी सकाळी ईडीने समन्स बजावले. याबाबत फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी ‘मी ईडीचा प्रवक्ता नाही’, अशा शब्दांत ईडीवरून भाजपाला घेरणाऱ्यांना टोला लगावला. पुरावे असतील म्हणून ईडी चौकशी करत असेल, असे ते म्हणालेत.
हेही वाचा -आमच्यात शत्रूत्व नाही; विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा शिवसेनेबाबत सॉफ्ट कॉर्नर?
'आधुनिक शहरात रुपांतर'
नवीन शहर बस सुविधेबाबत मी महानगरपालिकेचे अभिनंदन करतो. आधुनिक सुविधा आहे. ती अजून डेव्हलप करावी लागणार आहे. आता महानगरपालिकेने 50 इलेक्ट्रिक बस केंद्र सरकारकडे मागितल्या आहेत. त्याही आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. निओ मेट्रो आणि नवीन बस सिस्टीम यांचे इंटिग्रेशन झाल्यानंतर एका आधुनिक शहरात नाशिकचे रूपांतर होईल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.