महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जगात केवळ 6 टक्के लोक पदवीधर; नवीन तंत्रज्ञानाने शिक्षण देणे शक्य - मायकल मॅथ्यूज - Graduate

मॅथ्यूज हे अमेरिकेतील ओरल रॉबर्ट युनिव्हर्सिटी येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. ओआरयु जिओविजन टेक्नॉलॉजी ही जगातील संकल्पना त्यांनी विकासात केली आहे, यातून ते 185 देशांमध्ये डिजिटल शिक्षणाबाबत माहिती देत आहेत.

मायकल मॅथ्यूज

By

Published : Jul 22, 2019, 9:04 PM IST

नाशिक- जगात केवळ 6 टक्के लोक पदवीधर असून नवीन तंत्रज्ञानाने शिक्षण दिले तर 60 टक्के लोक पदवीधर होतील, असे मत जागतिक दर्जाचे शिक्षणतज्ञ मायकल मॅथ्यूज यांनी व्यक्त केले. ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.

मायकल मॅथ्यूज

30 मानवी अधिकारांपैकी शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, असे असताना जगात केवळ 6 टक्के लोक पदवीधर असल्याचे समोर आले आहे. शिक्षणाबद्दल लोकांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. जेव्हा तुम्ही साक्षर असला तेव्हाच अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी मिळतील, असे मत मायकल मॅथ्यूज यांनी व्यक्त केले.

जगभरातील लोकसंख्येपैकी 25 टक्के लोकसंख्या भारतात आहे. भारतातील प्रत्येकाच्या शिक्षणाचा प्रश्न जर नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सोडवला तर जगाच्या 25% समस्या आपण सोडवू शकतो. जागतिक शिक्षणाच्या संकटातून मोठा अडथळा दूर करता येईल, असे मॅथ्यूज म्हणाले. मोबाइल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, त्याचा वापर जर शिक्षणासाठी केला तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आकर्षण निर्माण होईल, असे मॅथ्यूज यांना वाटते.

ABOUT THE AUTHOR

...view details