महाराष्ट्र

maharashtra

केवळ पाच वर्षीय चिमुकलीने मंगलगड सर करून रचला इतिहास, असा पराक्रम करणारी सर्वात लहान गिर्यारोहक

By

Published : Nov 11, 2021, 6:08 AM IST

देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन (Children's Day) साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी रविवारी साजऱ्या होणाऱ्या बालदिनानिमित्त ईटीव्ही भारतने असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांचे कतृत्व 'बालवीर' या लेख मालिकेतून मांडले आहे..

Children's Day
Children's Day

नाशिक - देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन (Children's Day)साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येत असते. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे असते कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात.

पाच वर्षीय चिमुकलीने मंगलगड सर करून रचला इतिहास

पाच वर्षीय चिमुकलीने सर केला कठीण समजला जाणारा मलंगगड -

नाशिकची अवघ्या पाच वर्षांची गिर्यारोहक अरणा इप्पर हिने कठिण समजला जाणारा मलंगगड सर करण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे तिने त्यात रॅपलिंग आणि पोलक्रॉसिंग केले. भल्या-भल्यांची अशा साहसी ठिकाणी भंबेरी उडते अशा ठिकाणी अरणाने अगदी सहजतेने टप्पा पार केलाय. तसे तिचे हे ट्रेकिंग तिसरे आहे.

मलंगगड सर करणारी चिमुकली

चिमुकलीची केलेली गंमत त्यांच्यावरच उलटली, अरणा काही थकलीच नाही -

वयाच्या पाचव्या वर्षी अरणाने मलंगगड सर करणे काही साधी बाब नाहीये. कमी वयात तिने केलेला हा धाडसी ट्रेक अनेकांसाठी आश्चर्याची बाब आहे. गड सर करण्यामागची स्टोरीही तितकीच रंजक आहे. अरणाच्या वडिलांनी मुलगी खूप त्रास देते म्हणून तिला थोडसे थकवू म्हणून केलेली गंमत त्यांच्यावरच उलटली. अरणा काही थकलीच नाही. वडील किशोर मात्र थकले. अरणा तशी घरात खोडकर आहेच. पण बापाला मुलीने हरविल्याने त्यांना कुटुंबाला आनंद झाला आहे. अरणाने मलंग गड सर केल्याने सर्वाधिक आनंद तिच्या आईला झाला आहे. दरम्यान अरणाने केलेल्या ट्रेकिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चिमुकलीकडून मलंगगड सर
अभिनंदन केले तेव्हा वडिलांच्या डोळ्यात पाणी आले..
अरणाने या आधी हरिश्चंद्रगड, रामशेज किल्ला तसेच उंच असलेली नाशिक शहरातील चांभार लेणी सर केली आहेत. मलंगगड चढाई करत असताना पोल क्रॉसिंगच्या वेळेस वडील देखील खचून गेले होते. परंतु मुलीने हट्ट पकडला पोल क्रॉसिंग करत अर्धा टप्पा पार केला आणि सोबत असलेल्या पर्यटकांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले. तेव्हा वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. कमी वयात इतका मोठा गड सर करणे सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे भविष्यात अरणा आणखी नवनवे ट्रेकिंग करून विक्रम करणार यात शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details