नाशिक - गर्दीचा फायदा एका महिला चोराने ग्राहकाच्या पर्समधून जवळपास 20 हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार मेन रोड परिसरात घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
उत्सवाच्या काळात चोरट्यांचा सुळसुळाट... बाजारपेठेत वावरताना काळजी घ्या! - नाशिक क्राइम
गर्दीचा फायदा एका महिला चोराने ग्राहकाच्या पर्समधून जवळपास 20 हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार मेन रोड परिसरात घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
दिवाळीच्या खरेदीसाठी सध्या नाशिककर बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. याचाच फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केलेत. पाकिटमार, सोनसाखळी चोर यांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. किरकोळ चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीचे प्रमाणही वाढले आहे. असाच एक चोरीचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मुख्य बाजारपेठेत घडला. मेन रोड परिसरात दिवाळीनिमित्त खरेदी करत असलेल्या मीना कानडे या महिलेच्या पर्समधून एका चोर महिलेने जवळपास वीस हजार रुपयांची रोकड शिताफीने लंपास केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
बाजारपेठांमध्ये महिला चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचं बघायला मिळत असून गर्दीचा फायदा घेत हे चोरटे हात साफ करत आहेत. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोयय. यामुळे पोलीस नेमकं करतात काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असून रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.