महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये हेल्मेटसक्तीवर वाहनधारकचा नवा फंडा.. पेट्रोल भरण्यापुरते दुसऱ्याचे हेल्मेट, नागरिकांचा गोंधळ कॅमेऱ्यात कैद - नाशिकमध्ये नो हेल्मेट नो पेट्रोल

१५ ऑस्टपासून नाशकात सुुरु झालेल्या नाे हेल्मेट, नाे पेट्राेल माेहिलेला नागरिकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हेल्मेट सक्तीने त्रस्त नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी नवा फंडा शोधला आहे. पेट्रोल भरण्यापुरते वाहनचालक दुसऱ्याचे हेल्मेट वापरत आहेत. गाडीत पेट्राेल भरण्यासाठी आलेले विनाहेल्मेट चालक पंपाच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या वाहनधारकाचे हेल्मेट तात्पुरते घालून हा फंडा अमलात आणताना दिसत आहेत.

No helmet no petrol campaign
No helmet no petrol campaign

By

Published : Aug 17, 2021, 3:50 PM IST

Updated : Aug 17, 2021, 4:18 PM IST

नाशिक - १५ ऑगस्टपासून नाशकात सुुरु झालेल्या नाे हेल्मेट, नाे पेट्राेल माेहिलेला नागरिकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हेल्मेट सक्तीने त्रस्त नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी नवा फंडा शोधला आहे. पेट्रोल भरण्यापुरते वाहनचालक दुसऱ्याचे हेल्मेट वापरत आहेत.

नाशिकमध्ये हेल्मेटसक्तीवर वाहनधारकचा नवा फंडा


तात्पुरत्या हेल्मेट वापरामुळे वाढणार कोरोनाचा धोका -

१५ ऑगस्टपासून सुरू केलेल्या 'नो हेल्मेट नो पेट्रोल' या मोहिमेला नाशिक शहरात आता अल्प प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. अनेक नागरिक आज देखील विना हेल्मेट पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येत आहेत. या मोहिमेला काही नागरिकांनी विरोध देखील केला आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणीत असताना हेल्मेट कुठून घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान काही पेट्रोल पंपावरती तरी हेल्मेट चक्क भाड्याने देण्यात येत असल्याचे देखील चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर काही पंपांवर नागरिक एकमेकांचे हेल्मेट घेऊन पेट्रोल भरले जात असल्याने कोरोनाचा धोका वाढणार आहे.

भाड्याने ठेवलेले हेल्मेट
हेल्मेट घातले नसेल तर वाहनचालकाचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव RTO कडे वाहतूक शाखेकडून पाठवला जाणार आहे.

अनेक पंपांवर नागरिकांची तारांबळ -

१५ ऑगस्ट राेजी पालकमंत्री छगन भुजबळ व पाेलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले हाेते. त्यानंतर आता २ दिवसातच या उपक्रमाच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. गाडीत पेट्राेल भरण्यासाठी आलेले विनाहेल्मेट चालक पंपाच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या वाहनधारकाचे हेल्मेट तात्पुरते घालून हा फंडा अमलात आणताना दिसत आहेत. अनेक पंपांवर नागरिकांची तारांबळ पाहायला मिळत असून पंपावर येऊन अनेक जण दुसऱ्याचे हेल्मेट तात्पुरते घालून पेट्राेल मिळवत आहेत. एकदा पेट्राेल मिळाले, की हे लाेक संबंधिताचे हेल्मेट देऊन रवाना हाेत आहेत. यातून पंपावर आलेल्या नागरिकांचा गोंधळ कॅमेरात कैद हाेत आहे. नाशिक शहरात २०१७ ते जून २०२१ या साडेचार वर्षांच्या काळात ७८२ अपघातांमध्ये ४६७ दुचाकीस्वार हे मरण पावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात ३९४ दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले नव्हते, हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. हीच आकडेवारी विचारात घेता शहरात हेल्मेटसक्ती केली आहे. काही आरोग्याची समस्या किंवा इतर काही विशेष कारणास्तव हेल्मेट घातले नसेल तर वाहनचालकाचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे वाहतूक शाखेकडून पाठवला जाणार आहे.

Last Updated : Aug 17, 2021, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details