महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Pawar : साखर कारखान्यांमध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही - अजित पवार

साखर कारखान्यांच्या बाबतीत कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. काही बाबतीत अनियमितता झाली, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले ( No Corruption Sugar Mills Say Ajit Pawar ) आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar

By

Published : Apr 24, 2022, 10:47 PM IST

नाशिक -साखर कारखान्यांच्या बाबतीत कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. काही बाबतीत अनियमितता झाली, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले ( No Corruption Sugar Mills Say Ajit Pawar ) आहे.

नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अंबड शाखेचा लोकार्पण सोहळा अजित पवार आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार संवाद साधताना

कारखाने चालवणं हे काही येड्यागबाळ्याचं काम नाही - महाराष्ट्रातील बंद पडलेले साखर कारखाने काही जण चालवायला घेतात. काही जण आरोप करतात की हेच कसे चालवतात. विशेष म्हणजे आजही १२ कारखाने राज्य सहकारी बँकेला चालवायला द्यायचे आहे, ज्याच्यात धमक असेल त्याने घ्यावा. काही जण म्हणतात की, ठराविक लोकांची मक्तेदारी आहे. आम्हा काही लोकांच्या बदनाम्या व्हायच्या त्या झाल्या. वेगवेगळ्या पद्धतीने एसीबी, सीआयडीच्या चौकश्या झाल्या. कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही काही बाबतीत अनियमितता झाली असेल. पण, कारखाने चालवणे हे काही येड्यागबाळ्याचे काम नाही, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Uddhav Thackeray Meet Chandrabhaga Shinde : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह घेतली 'फायर आज्जीची' भेट

ABOUT THE AUTHOR

...view details