महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इगतपुरी रेव्ह पार्टी : टॉलिवूड आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील तरुणी ताब्यात - रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

इगतपुरी परिसरातील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून कोकेन, ड्रग्स व इतर साहित्यही ताब्यात घेतले, अशी माहिती माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

रेव्ह पार्टी
रेव्ह पार्टी

By

Published : Jun 27, 2021, 9:59 PM IST

नाशिक -इगतपुरी परिसरातील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून कोकेन, ड्रग्स व इतर साहित्यही ताब्यात घेतले, अशी माहिती माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

इगतपुरी रेव्ह पार्टी : टॉलिवूड आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील महिला ताब्यात

रेव्ह पार्टीत एका परदेशी महिलेचाही समावेश
ड्रग्स प्रकरणी मुंबईहून एक नायजेरियन नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी काही महिलांनी साऊथ आणि बॉलिवूड फिल्ममध्येही काम केले आहे. त्यात एका परदेशी महिलेचाही समावेश आहे. इतर स्टाफला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ईगतपुरी पोलीस ठाण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत.

हायप्रोफाइल पार्टीचा नाशिक ग्रामीण पोलिसांकडून भांडाफोड
इगतपुरी परिसरात पोलिसांनी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा टाकत तब्बल 22 जणांना ताब्यात घेतले. यामध्ये दहा पुरुष व बारा महिलांचा समावेश आहे. या पार्टीत पोलिसांना हुक्का, कोकेन, ईतर ड्रग्स मिळाले आहे. यामध्ये काही महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तर एका महिलेने बिग बॉस या शोमध्ये काम केले आहे. त्यामुळे अशा हायप्रोफाइल पार्टीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी भांडाफोड केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा -इगतपुरीत हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर छापा, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीसह 22 जणांवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details