महाराष्ट्र

maharashtra

Chhagan Bhujbal: धमकी प्रकरणाची चौकशी करावी, छगन भुजबळांची मागणी; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By

Published : Oct 1, 2022, 5:50 PM IST

Chhagan Bhujbal: गुन्हा दाखल झाल्याचे वर्तमान पत्र आणि माध्यमांमधून समजलं. मागच्या 10 वर्ष जे आमच्या सोबत होते, त्या टेकचंदानी यांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्यासोबत काहीही संबंध नाही. त्यांचा नंबर देखील डिलिट केेल आहे. पण ते सतत मला मॅसेज करून त्रास देत होता. मी धमकी दिली नाही, बोललो देखील नाही. सरस्वती वादाचा फायदा घेत त्याने केलं आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे माहिती दिली असून या प्रकरणाची चौकशी करावी, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ncp leader chhagan bhujbal यांनी दिले आहे. chembur trader lalit teckchandani threat case

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक: Chhagan Bhujbal: गुन्हा दाखल झाल्याचे वर्तमान पत्र आणि माध्यमांमधून समजलं. मागच्या 10 वर्ष जे आमच्या सोबत होते, त्या टेकचंदानी यांनी गुन्हा दाखल chembur trader lalit teckchandani threat case केला. त्यांच्यासोबत काहीही संबंध नाही. त्यांचा नंबर देखील डिलिट केला आहे. पण तो सतत मला मॅसेज करून त्रास देत होता. मी धमकी दिली नाही, बोललो देखील नाही. सरस्वती वादाचा फायदा घेत त्याने केलं आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे माहिती दिली असून या प्रकरणाची चौकशी करावी, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ncp leader chhagan bhujbal यांनी दिले आहे.

मी त्याला कधीही फोन केला नाहीभुजबळ फार्म येथे शनिवारी पत्रकार परिषद घेत भुजबळ यांनी टेकचंदानी प्रकरणी सर्व आरोप फेटाळत भूमिका स्पष्ट केली आहे. टेकचंदानी मॅसेज करायचे, म्हणून मी सदर नंबर तपासण्यासाठी कार्यकर्त्याला सांगितलं. पुण्याच्या कार्यकर्त्याने त्याला विचारलं, तू भुजबळांना का त्रास देतो. त्यावेळी त्यांनी सांगितल समोर येऊन चर्चा करु. मी त्याला कधीही फोन केला नाही. दुसऱ्याने केला तो ही त्याने उचललं नाही. जे काही झालं ते चॅटिंगवर झाले आहे. कार्यकर्त्यासोबत आहे. पण त्यात देखील धमकी दिलेली नाही. पण हे जे काही जे काही घडल. त्याबद्दल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

निगेटिव्ह मॅसेज केलेया प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करत मी जर त्यांच्या सोबत बोलत नाही. तर त्याने मला का त्रास द्यावा. छगन लाल चिकी खाय बिकी खाय, असे मॅसेज मला का करावे. मी त्याच्याशी कधीही बोललो नाही. त्याच्यांकडून मला त्रास दिला गेल्यासारखे सारखे मला त्याने निगेटिव्ह मॅसेज केले, असा आरोप त्याने केला. तो व्यक्ती अगोदर मुंडे साहेब यांच्याकडे होता. त्यानंतर आमच्यासोबत काम केलं आहे. नंतर त्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आम्ही त्याला बाजूला केलं. म्हणून त्याने हे सगळ तक्रारी सुरू केल्या आहेत.

योग्य ती कारवाई करतीलयाप्रकरणी मी काहीही तक्रार सद्या करणार नाही. वकिलांचा सल्ला घेईल. मी सरकारला पत्र लिहिलं आहे, ते योग्य ती कारवाई करतील. शेवाळे यांनी देखील अनभिज्ञपणे असे ट्विट केलं असेल. या मागे कुणाचाही हात असेल, अस वाटत नाही. यापूर्वी त्याने आम्हाला अनेक केसेस करून गुंतवल आहे. मात्र न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला, अशी बाजू त्यांनी मांडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details